New yedamai song | बोलना गं बोलना येडामाई बोलना | bolna g bolna yedamai bolna | song by sk brothers .....
उभा हात जोडून
रुसवा दे सोडून.......2
काय चाललं तुझ्या मनामधी खोल ना......
बोलना ग बोलणा येडामाई बोलना.....2
काळीज काढून तुझ्या चरणा पाशी ठेऊ...
भक्तिच्या माझा कसा पुरावा मी देऊ...2
किती पडू पाया ग
थोडी लाव माया ग...2
शब्द या भक्ताचा येडू तोलना....
ए बोलना ग बोलणा येडामाई बोलना.....2
सुख समाधान येडू मिळल मला सार..
जीवनात कमी फक्त येडू तुझाच आधार...2
भेट मला देऊनी
जगी दे दाऊनी...2
भक्तावर माया अनमोल ना.....
बोलना ग बोलणा येडामाई बोलना.....2
जवा काय डोळे भरून तुला मी पाहिली..
मनामधे इच्छा माझ्या नाही ग राहिली....2
मंगल सुरात ग
गातो सिध्दनाथ ग....2
साजनच्या गाण्यावरी डोलणा डोलणा .....
बोलना ग बोलणा येडामाई बोलना.....2